आयडीबीआय बँकेतील या भरती प्रक्रियेला ९ डिसेंबर २०२३ पासून सौरुवात होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार २५ डिसेंबर २०२३ पर्यंत ओंलियन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
आयडीबीआय बँकेच्या या भरतीमधील पदांसाठी २८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
डेप्युटी मॅनेजरसाठी वयोमर्यादा ३५ ते ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
अर्ज शुल्काविषयी :
सामान्य : १०० रुपये
SC, ST : २०० रुपये
मिळणार एवढा पगार :
डेप्युटी मॅनेजर ग्रेड डी : १ लाख ५५ हजार रुपये प्रति महिना.
असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी : १ लाख २८ हजार रुपये प्रति महिना.
व्यवस्थापक ग्रेड बी : ९८ हजार रुपये प्रति महिना.
निवड प्रक्रिया :
उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत आणि गटचर्चेसाठी (Group Disscssion) बोलावले जाईल.
महत्त्वाची कागदपत्रे:
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नोंदणी प्रमाणपत्र
आयडीबीआय बँक भरतीसाठी याप्रमाणे अर्ज करा:
- IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जा.
- मुख्यपृष्ठावरील ऑनलाइन फॉर्म लिंकवर क्लिक करा.
- अर्जामध्ये वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा.
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज शुल्क भरा.
- त्याची प्रिंट काढून ठेवा.
महत्त्वाच्या लिंक्स :
आयडीबीआय बँकेतील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आयडीबीआय बँकेतील भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.