पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या करिता एकूण ७७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी या पदांचा समावेश आहे.

नुकतीच याबाबत पुणे महानगरपालिकेने अधिसूचना प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. या मुलाखती पदांनुसार महिन्याच्या दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या मंगळवारी आणि गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘पुणे महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
प्राध्यापक – ०७ जागा
सहयोगी प्राध्यापक – १२ जागा
सहायक प्राध्यापक – १८ जागा
वरिष्ठ निवासी – २१ जागा
कनिष्ठ निवासी – १९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ७७ जागा

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023: नागपूर महानगरपालिकेत महाभरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार एमडी/ एमएस/ डीएनबी आदि अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. सविस्तर पात्रता पदनिहाय अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

नोकरी ठिकाण : पुणे

वेतन :
प्राध्यापक – १ लाख ८५ हजार
सहयोगी प्राध्यापक – १ लाख ७० हजार
सहायक प्राध्यापक – १ लाख
वरिष्ठ निवासी – ८० हजार २५०
कनिष्ठ निवासी – ६४ हजार ५५१

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे

मुलाखतीची तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे ६ डिसेंबर २०२३ पासून महिन्याच्या दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या मंगळवारी आणि गुरुवारी (पदनुसार विभागून)

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पुणे महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया: मुलाखतीला येताना अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गजरेचे आहे. शिवाय अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. तसेच कोणत्या पदासाठीची मुलाखत कधी होणार हे देखील अधिसूचनेत नमूद केले आहे.

Source link

pmc recruitment 2023pune municipal Corporation medical collegerecruitmentअटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२३पुणे महानगरपालिका भरती २०२३पुणे महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment