एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या कोची, कालिकत आणि कन्नूर अशा विविध स्टेशन्सवरील एकूण १०० हून अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
पदभरतीचा तपशील :संस्था : एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AI Airport Services Limited (AIASL) म्हणजेच Air India Transport Services Limited
भरले जाणारे पद :
१. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (Customer Service Executive)
२. ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (Jr. Customer Service Executive)
या भरतीअंतर्गत, ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Service Executive) आणि कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी (Jr. Customer Service Executive) पदांवर भरती केली जाणार असून, कोची, कालिकत आणि कन्नूर येथील वर्क स्टेशन्स वर ही भरती प्रक्रिया वेगवेगळया दिवशी पार पडणार आहे.
पद संख्येनुसार तपशील :
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदांच्या कोचीमधील ४७ जागा, कालिकतमधील ३१ जागा आणि कन्नूरमधील ५० अशा तब्बल १२८ जागांवर ही भरती होणार आहे.
मुलाखतीचे वेळापत्रक :
कोचीमधील जागांसाठी : १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
कोचीमधील जागांसाठी : २० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
कोचीमधील जागांसाठी : २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
मुलाखतीचा पत्ता :
Sri Jagannath Auditorium, Near Vengoor Durga Devi Temple, Vengoor, Angamaly, Ernakulam, Kerala, Pin 683572
शैक्षणिक पात्रता:
ग्राहक सेवा कार्यकारी :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
- एअरलाइन/जीएचए/कार्गो/एअरलाइन तिकिटाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
- किंवा एअरलाइन डिप्लोमा किंवा IATA-UFTAA किंवा IATA-FIATA किंवा IATA-DGR किंवा IATA डिप्लोमा इन कार्गो सारखा मान्यताप्राप्त कोर्स.
- संगणकाचे ज्ञान, हिंदी व इंग्रजीचे ज्ञान.
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी :
- मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास.
- एअरलाइन/जीएचए/कार्गो/एअरलाइन तिकिटाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- किंवा एअरलाइन डिप्लोमा किंवा IATA-UFTAA किंवा IATA-FIATA किंवा IATA-DGR किंवा IATA डिप्लोमा इन कार्गो सारखा मान्यताप्राप्त कोर्स.
- संगणकाचे ज्ञान, हिंदी व इंग्रजीचे ज्ञान
वयोमर्यादा :
0 एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडमधील कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारचे वय २८ वर्षापर्यंत असावे.
0 ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची तर एससी आणि एसटी (SC and ST) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची शिथिलता देण्यात येईल.
अर्ज शुल्काविषयी :
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
डिमांड ड्राफ्टद्वारे ही फी भरता येणार आहे.
SC/ST/X-Servicemen मोफत अर्ज करू शकतात.
मिळणार एवढा पगार :
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह : २३ हजार ६४० रुपये प्रती महिना
ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह : २० हजार १३० रुपये प्रती महिना
महत्त्वाच्या लिंक्स :
एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.