मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये स्टाफ नर्स पदासाठी महाभरती; आजच कर अर्ज

Military Nursing Service Recruitment 2023: तुम्ही नर्सिंगचे शिक्षण घेतले असेल तर इंडियन आर्मीमध्ये भरती सुरू आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंतर्गत ही भरती होणार असून ‘मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस: शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ साठी स्टाफ नर्स पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये एकूण २०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबत ‘एनटीए’ने नुकतीच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ११ डिसेंबर २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तर २६ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस : शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
स्टाफ नर्स – २०० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २०० जागा

PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे उमेदवार बीएससी नर्सिंग उत्तीर्ण असावा. विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३५ वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : ११ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २६ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Indian Army Recruitment 2023Military Nursing Service Recruitment 2023recruitmentshort service commission jobsइंडियन आर्मी भरती २०२३मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस भरती २०२३
Comments (0)
Add Comment