यापदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याआधी केंद्र सरकारच्या अप्रेंटीस नोंदणीच्या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या नोंदणीनंतर उमेदवारणे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन नोंदणी १२ डिसेंबरच्या आधी करायची आहे. तर ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी २१ डिसेंबर शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महावितरण अमरावती भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
शिकाऊ उमेदवार – ६९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६९ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ‘आयटीआय’ परीक्षा उत्तीर्ण असावा. याशिवाय अधिकचे तपशील जाहिरातीत दिले आहे. त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
नोकरी ठिकाण : अमरावती
वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन आणि ऑफलाईन
ऑफलाइन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती
ऑफलाइन अर्जाची प्रत पाठविण्याची तारीख : १९ डिसेंबर २०२३ ते २१ डिसेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महावितरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.