‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ येथे विविध पदांची भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

National Highways Authority of India Recruitment 2023: ‘एनएचएआय’ म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीमध्ये सल्लागार आणि संयुक्त सल्लागार या पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०४ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
सल्लागार – ०१ जागा
संयुक्त सल्लागार – १७ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १८ जागा

शैक्षणिक पात्रता :
सल्लागार : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतून पदवीधर असावा. तसेच फॉरेस्ट, अ‍ॅग्रीकल्चर, होर्टीकल्चर, सोशल फोरेस्ट्री आदि क्षेत्रात कामाचा २० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

संयुक्त सल्लागार – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतून पदवीधर असावा. तसेच फॉरेस्ट, अ‍ॅग्रीकल्चर, होर्टीकल्चर, सोशल फोरेस्ट्री आदि क्षेत्रात कामाचा १५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

NTPC Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी ‘एनटीपीसी’ मध्ये मोठी भरती; पगारही आहे भरपूर

वेतन :
सल्लागार – १ लाख ६० हजार ते १ लाख ७५ हजार
संयुक्त सल्लागार – ९० हजार ते १ लाख २५ हजार

वयोमर्यादा : कमाल वय ६५ वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०४ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

govenment jobsNational Highways Authority of India jobsnhai bharti 2023nhai recruitment 2023recruitmentभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नोकरी
Comments (0)
Add Comment