CLAT 2024 चा निकाल जाहीर; उमेदवारांना ऑनलाइन पाहता येणार निकाल

CLAT 2024: कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. यावेळी ही परीक्षा स्टुडंट्स कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने (CNLU) घेतली. या परीक्षेद्वारे, पात्र उमेदवारांना बॅचलर आणि मास्टर स्तरावरील कायदा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. यावर्षी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (CNLU) च्या स्टुडंट्स कन्सोर्टियमने CLAT 2024 प्रवेश परीक्षा ३ डिसेंबर २०२३ रोजी देशभरातील १३९ परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतात आणि स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात. एलएलबी आणि एलएलएम प्रवेश, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) मध्ये भरतीसाठी देखील सीएलएटी स्कोअर ग्राह्य धरले जातात.

सीएलएटी २०२४ निकाल तपासण्याच्या पायर्‍यांविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

पायरी १ : उमेदवारांनी CLAT परीक्षेच्या अधिकृत वेबसाइट, consortiumofnlus.ac.in ला भेट द्या .
पायरी २ : त्यानंतर मुख्यपृष्ठावरच सक्रिय केलेल्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
पायरी ३ : लिंकवर क्लिक केल्यानंतर, उमेदवारांनी निकाल पृष्ठावर त्यांचा अर्ज क्रमांक किंवा प्रवेशपत्र क्रमांक आणि जन्मतारीख तपशील भरून सबमिट करा. पायरी ४ : सबमिशन केल्यानंतर, तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
पायरी ५ : आता तुमचा निकाल तपासा आणि भविष्यासाठी हार्ड कॉपी देखील ठेवा.

कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएलएटी) च्या निकालाच्या आधारे यासाठी प्रवेश मिळतो :

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ७० हून अधिक संलग्न सीएलएटी कॉलेजेस ५ वर्षांच्या बीए एलएलबी कोर्स, एलएलएम कोर्स अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो.

CLAT साठी पात्रता :

वरिष्ठ माध्यमिक शाळा किंवा इंटरमिजिएट किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून विद्यार्थ्याने समकक्ष प्रमाणपत्र एकूण गुणांपैकी ४५ टक्के पेक्षा कमी नसावेत. SC आणि ST साठी अर्जदारांना एकूण गुणांच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

Source link

clatclat 2024clat 2024 resultclat result 2024consortiumofnlus.ac.inhow to check clat result 2024Law Entrance Examsteps to check clat 2024 resultक्लैट 2024 रिजल्टक्लैट निकाल २०२
Comments (0)
Add Comment