योग प्रशिक्षकांसाठी अमरावती जिल्हा परिषदेत मोठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

NHM Amravati Yog Instructor recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ही भरती अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी असून याद्वारे ‘योग प्रशिक्षक’ पदाच्या अनेक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत जिल्हा परिषदेने अधिसूचना जाहीर केली आहे.

त्यामुळे तुम्ही तर योग विषयातील शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १५ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या आणि पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती २०२३’ मधील पद आणि पदसंख्या –
योग प्रशिक्षक – पदसंख्या निश्चित नाही

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून योग विषयातील पदव्युत्तर पदवी, पदवी किंवा पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच त्याला योग प्रशिक्षणाचा अनुभव असावा. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

BMC LTMGH Recruitment 2023: मुंबईच्या ‘सायन हॉस्पिटल’ मध्ये भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

नोकरी ठिकाण – अमरावती

वेतन – ०८ हजार (मासिक)

अर्ज शुल्क – १५० रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाइन

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
१५ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जिल्हा परिषद, अमरावती’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १५ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

NHM Amravati Bharti 2023NHM Amravati Recruitment 2023recruitmentZP Amravati Recruitment 2023जिल्हा परिषद अमरावती भरती २०२३योग प्रशिक्षक भरती २०२३राष्ट्रीय आरोग्य अभियान २०२३
Comments (0)
Add Comment