महाराष्ट्रात अन्न पुरवठा निरीक्षकाच्या ३४५ रिक्त जागांसाठी भरती, कमाल वय ४३ वर्षे, तर ८० हजारांपेक्षा जास्त पगार

Department of Food Civil Supplies and Consumer Protection : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरिता आय.बी.पी.एस (Institute of Banking Personnel Selection) मार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरसेवा भरती २०२३ घेण्यात येणार असून, परीक्षेसंबंधित इतर माहिती विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून कळवले जाईल.

पदभरतीचा तपशील :

या पदांवर भरती केली जाईल

अन्न पुरवठा निरीक्षक (गट क) :

कोकण : ४७ पदे
पुणे : ८२ पदे
नाशिक : ४९ पदे
छत्रपती संभाजीनगर : ८८ जागा
अमरावती : ३५ पदे
नागपूर : २३ पदे

उच्चस्तरीय लिपिक (गट क) :

आर्थिक सल्लागार आणि उपसचिव कार्यालय, मुंबई : २१ पदे
एकूण रिक्त जागा : ३४५

Bombay High Court मध्ये कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांच्या ४,६२९ जागांवर भरती, १ लाखांपेक्षा जास्त पगार

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली पात्रता.
परंतु, पुरवठा ननरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान (Food Technology or Food Science” विषयामध्ये पदवी धारण करणार्‍या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज / माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

  • सर्व प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण इतकी राहील.
  • खुल्या प्रवर्गातील उममेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे अशी राहील.
  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : 0१ डिसेंबर २०२३

(प्राविण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी मूळ जाहिरात वाचा)

निवड प्रक्रिया :

संगणक आधारित चाचणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज शुल्काविषयी :

सामान्य : १००० रुपये
OBC, SC, ST, उर्वरित राखीव प्रवर्ग : १०० रुपये
PH श्रेणी : विनामूल्य

मिळणार एवढा पगार :

0 अन्न पुरवठा निरीक्षक पदासाठी : २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपये
0 तर, उच्चस्तरीय लिपिक पदासाठी : २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये

असा करा अर्ज :

  • महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क विभागातील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahafood.gov.in/website/marathi/home.aspx ला भेट द्या.
  • फॉर्ममध्ये मूलभूत तपशील भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फी भरून फॉर्म सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट आऊट घेऊन तुमच्याकडे ठेवा.

महत्त्वाच्या लिंक्स :

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क विभागातील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

fcscpd recruitment 2023government jobsgovernment of maharashtramaharashtra governmentmahrahstrasarkari naukariअन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमहाराष्ट्र शासन नोकरी २०२३सरकारी नोकरी
Comments (0)
Add Comment