या पदांनुसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. या मुलाखती २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘ठाणे महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
टयुटर/क्लिनिक इन्स्ट्रक्टर – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून नर्सिंग विषयातील पदवी उत्तीर्ण असावा.(B.Sc. Nursing / PBBSc. Nursing) तसेच त्याला संबधित कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असावा. ज्या उमेदवारांकडे नर्सिंग विषयातील पदव्युत्तर पदवी असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये उमेदवाराची नोंदणी असणे आवश्यक आहे.
वेतन: ५९ हजार (मासिक)
नोकरी ठिकाण : ठाणे
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
मुलाखतीची तारीख : २२ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘ठाणे महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया: या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत संबधित दिलेल्या स्थळी २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. मुलाखतीला येताना उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गजरेचे आहे. शिवाय अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी.