टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे भरती; जाणून घ्या पदे,पात्रता आणि वेतन

Tata Institute of Fundamental Research Recruitment 2023: टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (कॅन्टीन) या पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत संस्थेने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०४ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने केली जाणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि मुलाखत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२३’ पदे आणि पदसंख्या :
पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (कॅन्टीन) – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

COSMOS Bank Recruitment 2023: पुण्यामध्ये कॉसमॉस बँकेत ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी किंवा समकक्ष विषयातून तीन वर्ष पूर्ण वेळ अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त असावा. त्याला संगणक, टायपिंग आणि संवाद कौशल्ये याची उत्तम जाणा असावी. तसेच पर्यवेक्षक किंवा व्यवस्थापक म्हणून संबधित कामाचा अनुभव हवा.

वेतन : २३ हजार (मासिक)

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा :
कमाल २८ वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

निवड प्रक्रिया :
मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ०१ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जानेवारी २०२४

मुलाखतीची तारीख : ०४ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया : या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. ही मुलाखत प्रक्रिया संबधित दिलेल्या स्थळी ०४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०९ वाजता सुरू होणार आहे. सकाळी ९ नंतर आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. मुलाखतीला येताना उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गजरेचे आहे. शिवाय अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी.

Source link

recruitmentRecruitment NewsTata Institute of Fundamental Research jobsTIFR Bharti 2023TIFR Recruitment 2023टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती २०२३
Comments (0)
Add Comment