Defense Research and Development Organization – DRDO, Ministry of Defense, Government of India.च्या अधिकृत वेबसाइटवर याबद्दलची अधिकृत जाहीरात पाहून उमेदवार या जागांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार डीएसटी, एडीए आणि सीएमई विभागांमध्ये संस्थेमार्फत सदर भरती प्रक्रिया केली जाणार आहे. या भरतीमधून निवडलेल्या उमेदवारांना उत्तम पगार दिला जाणार आहे. या संबंधित अधिक माहिती संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला तपासू शकता.
पदभरतीचा तपशील :
स्टोअर्स ऑफिसर (Stores Officer) : १७ जागा
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : २० जागा
खाजगी सचिव (Private Secretary) : ६५ जागा
वयोमर्यादा :
स्टोअर ऑफिसर (PSO) : कमाल ५० वर्षे
प्रशासकीय सहाय्यक (PSAA) : कमाल ४५ वर्षे
अॅडमिन असिस्टंट (PAA) : कमाल ३५ वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
प्रोजेक्ट स्टोअर ऑफिसर : BA किंवा B.Com किंवा B.Sc पदवी आणि दहा वर्षांचा अनुभव.
प्रशासकीय सहाय्यक : BA, B.Com, B.Sc पदवी, BCA आणि ६वर्षांचा अनुभव.
प्रोजेक्ट अॅडमिन असिस्टंट: BA किंवा B.Com किंवा B.Sc पदवी किंवा तीन वर्षांच्या अनुभवासह BCA पदवी.
निवड प्रक्रिया:
अर्जांची छाननी केल्यानंतर, उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
याप्रमाणे अर्ज करा:
- अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जा.
- मुख्यपृष्ठावरील ‘करिअर्स’ अंतर्गत, ‘डीआरडीओ, संरक्षण मंत्रालयामध्ये प्रतिनियुक्तीच्या आधारावर विविध पदे भरणे’ या अधिसूचनेवर क्लिक करा.
- पोस्ट निवडल्यानंतर, परफॉर्मा दस्तऐवजांची प्रिंटआउट घ्या.
- फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवण्याचा पत्ता:
उमेदवार आपला अर्ज स्पीड पोस्टद्वारे या पत्त्यावर १२ जानेवारीपूर्वी पाठवू शकतात:
उपसंचालक, डीटीई ऑफ पर्सोनेल (पर्स-एएएल) रूम नंबर २६६ , दुसरा मजला, डीआरडीओ भवन, नवी दिल्ली – ११०१०
महत्त्वाच्या लिंक्स :
डीआरडीओ मधील भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
डीआरडीओ मधील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.