मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर; अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धतीचा प्रयोग यशस्वी

University Of Mumbai Exam Result : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अंतिम वर्षाच्या ऑक्टोबर २०२३ मध्ये संपन्न झालेल्या हिवाळी सत्राच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ या परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून कोणताही निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ.अजय भामरे, कुलसचिव डॉ. सुनील भिरूड व परीक्षा विभागाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच हा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व्यक्त केले.

बीकॉम सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण २१७४५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ६० हजार ०७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५७ हजार ६९२ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर २३८१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ३५८७४ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेत ७३ कॉपी केसेस झाल्या आहेत. बीकॉम सत्र ५ चा निकाल ३७.७४ टक्के लागला आहे.

अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी :

उन्हाळी सत्राच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकाल राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर झाले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने या हिवाळी सत्रापासून विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविलेली होती. ती फाईल परीक्षा केंद्राने डाऊनलोड करून विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली गेली. यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास मिळाली व या कारणासाठी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले नाहीत. तसेच विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे का नाही यासाठी ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र विद्यार्थ्याची उपस्थिती विद्यापीठाच्या ऑनलाईन उपस्थिती प्रोग्राममध्ये नोंदवली गेली .यामुळे विद्यार्थी उपस्थित आहे का नाही ते तात्काळ विद्यापीठास समजले.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या हिवाळी सत्राचे १८ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

Source link

bcom resultsmumbai university exam resultsmumbai university newsMumbai University Resultuniversity of mumbai bcom results 2023मुंबई विद्यापीठ निकालमुंबई विद्यापीठ बीकॉम निकाल
Comments (0)
Add Comment