पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती पालिकेच्या पदव्युत्तर संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता होणार आहे. यामध्ये कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ या पदांच्या एकूण ६४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच पालिकेने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
कनिष्ठ निवासी – ५६ जागा
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ – ०३ जागा
वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी – ०३ जागा
वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६४ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment 2023: ठाणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती, पगारही आहे भरपूर

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण असावा. तसेच एम.एम. सी म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन: (मासिक)
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ / वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी – ७५ हजार
वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ – ७५ हजार ते ८० हजार

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पिंपरी – चिंचवड महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २० डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

PCMC Bharti 2023PCMC recruitment 2023Pimpri Chinchwad Municipal Corporation jobsrecruitmentपिंपरी-चिंचवड महानगरपालिकापिंपरी-चिंचवड महापालिका
Comments (0)
Add Comment