नुकतीच पालिकेने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १८ डिसेंबर २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर २९ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सहाय्यक वैदयकीय अधिकारी – ०३ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार एम.बी.बी.एस. परिक्षा किंवा बीएएमएस परिक्षा उत्तीर्ण असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आह.
वेतन: (मासिक)
एमबीबीएस डॉक्टर – ७५ हजार
बीएएमएस डॉक्टर – ५० हजार
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, लोकमान्य टिळक म.स. रुग्णालय
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १८ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ डिसेंबर २०३३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २९ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.