नुकतीच मध्य रेल्वेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मधील विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती २७ डिसेंबर रोजी होणार आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘मध्य रेल्वे मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
सीएमपी (जीडीएमओ) – ०२ जागा
सीएमपी/स्पेशालिस्ट (सर्जन) – १ जागा
सीएमपी/स्पेशालिस्ट (स्त्रीरोगतज्ज्ञ) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयातील तज्ञ असावा.
नोकरी ठिकाण : मुंबई.
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे.
मुलाखतीची तारीख : २७ डिसेंबर २०२३.
मुलाखतीची वेळ : सकाळी १० वाजता
मुलाखतीचा पत्ता : सिनिअर डीपीओ ऑफिस, मध्य रेल्वे, कर्मचारी शाखा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, २ रा मजला, अॅन्नेक्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४०० ००१.
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सेंट्रल रेल्वे,मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया: या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया संबधित दिलेल्या स्थळी २७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. मुलाखतीला येण्याआधी उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गजरेचे आहे. शिवाय अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी.