पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये ३ हजारांहून अधिक जागांसाठी महाभरती; अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Indian Railway Recruitment 2023-24 : भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य रेल्वे विभागमध्ये एकूण ३ हजार १५ जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या संदर्भातील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून १५ डिसेंबर २०२३ पासून या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

सदर पदांकरीता अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. उमेदवार १४ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करायचा आहे.

पदभरतीचा तपशील :

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य रेल्वे विभागमध्ये एकूण ३ हजार १५ जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

सदर पद भरतीकरीता उमेदवार इयत्ता १० वी ५० % गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
तसेच, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा :

  • सदर पदांकरीता अर्ज करणार्‍या सादर करण्यासाठी अर्जदाराचे वय १४ डिसेंबर २०२३ किमान १५ वर्षे तर कमाल वय हे २४ वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे.
  • यांमध्ये मागास प्रवर्ग ( SC / ST ) करीता वयांमध्ये ५ वर्षे तर ओबीसी करीता वयांमध्ये ३ वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज शुल्काविषयी : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांनी आपले अर्ज हे https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ या वेबसाइटवर दिनांक १४ जानेवारी २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत.
सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी करीता १३६ रुपये तर SC/ST/PWD/ महिला प्रवर्ग करीता ३६ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा :

0 भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य रेल्वे भरतीच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात : १५ डिसेंबर २०२३

0 भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य रेल्वे भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : १४ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत

महत्त्वाच्या लिंक्स :

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य रेल्वे विभागातील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

indian railway bhartiindian railway recruitment 2023-24railway bhartirailway jobsrailway trade apprenticewest central railway department recruitmentwest-central railway bhartiइंडियन रेल्वे भरतीभारतीय रेल्वे भरती २०२३-२४
Comments (0)
Add Comment