राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथे भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

NHM Satara Recruitment 2023: तुम्ही एमबीबीएस किंवा बीएएमएस शिक्षण पूर्ण केले असेल आणि नोकरीची वाट पाहत असाल तर सातारा जिल्ह्यात उत्तम संधी चालून आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबण्यात आली आहे. १५व्या वित्त आयोगा अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या द्वारे ही भरती होणार आहे. यामध्ये ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत सातारा जिल्हा परिषदेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया १४ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे तर २२ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि वेतन याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
वैद्यकीय अधिकारी – १४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १४ जागा

NHM Mumbai Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई पालिकेतमध्ये मोठी भरती, आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे उमेदवार ‘एमबीबीएस’ किंवा ‘बीएएमएस’ पदवी प्राप्त असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण : सातारा

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय तळमजला, जिल्हा परिषद सातारा

अर्ज सुरू होण्याची तारीख : १४ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जिल्हा परिषद, सातारा’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २२ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

nhm recruitment 2023NHM Satara Recruitment 2023recruitmentZilla Parishad Satara recruitment 2023राष्ट्रीय आरोग्य अभियान २०२३
Comments (0)
Add Comment