नुकतीच विद्यापीठाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून २८ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे विद्यापीठ भरती २०२३’ मधील पदे :
‘टिचिंग स्टाफ’ गटातील पदे :
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
‘नॉन टिचिंग स्टाफ’ गटातील पदे :
व्यवस्थापक – डिजिटल मार्केटिंग, व्यवस्थापक/अधिकारी – आयटी , कुलगुरू सचिव, संचालक/व्यवस्थापक – अॅडमिशन, लेखा/कार्यालय कार्यकारी, स्ट्रॅटेजी मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, उप/सहाय्यक – COE/CAFO/ Registrar, प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :
‘टिचिंग स्टाफ’ गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार यूजीसीच्या निकषानुसार संबंधित पदाशी निगडीत सर्व परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच त्याचे संशोधन कार्यात विशेष योगदान असावे.
तर ‘नॉन टिचिंग स्टाफ’ गटातील पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संबधित पदाशी सबंधित शैक्षणिक अर्हता प्राप्त आणि अनुभवी असावे.
याव्यतिरिक्त विस्तृत पात्रता जाहिरातीत नमूद केली आहे. जाहिरात वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाइन / ई-मेल द्वारे
अर्ज पाठवण्यासाठी ई- मेल पत्ता : careers@despu.edu.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २८ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.