इंडियन ऑइलमध्ये १ हजार ६०३ जागांसाठी भरती; पात्रता आणि इतर तपशील जाणून घ्या

IOCL Apprentice Recruitment 2023: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अप्रेंटिस भरती २०२३ साठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल १६०३ जागांसाठी ही भरती होणार आहे. भरतीद्वारेट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ज्यासाठी ऑनलाइन अर्ज १६ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. तर IOCL शिकाऊ भरती २०२३ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०२४ आहे. त्यानंतर, कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. भरतीशी संबंधित तपशील रोजगार वृत्तपत्रात देखील प्रकाशित करण्यात आला आहे.

पदभरतीचा तपशील :

IOCL अप्रेंटिस भरती २०२३ अधिसूचना १ हजार ६०३ पदांसाठी ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना सूचना वाचल्यानंतरच अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण, चुकीची माहिती भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही. ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पोस्ट करता ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI सह दहावी -बारावी उत्तीर्ण केलेली असावी. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक माहिती तपासू शकतात.
  • टेक्निशियन अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
  • तर, पदवीधर अप्रेंटिस पदांकरीता उमेदवार हे B.COM / BA / BBA /B.SC उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा :

  • IOCL Apprenticeship Recruitment 2023 साठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे ठेवण्यात आले आहे.
  • ३१ ऑक्टोबर २०२३ आधार म्हणून वयाची गणना केली जाईल.
  • OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गांनाही नियमानुसार सूट दिली जाईल.

(वरील पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ हा आधार घेऊन गणण्यात येईल)

आयओसीएल अर्ज करण्यासाठी :
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– आता यूजर आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा.
– फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
– फी भरा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

IOCL द्वारे वेळोवेळी भरती केली जाते. ज्यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली जाते. यातील अनेक नोकरीच्या संधी GATE अंतर्गत अनेक भरती केल्या जातात. तर अभियांत्रिकी आणि आयटीआय उमेदवारांसाठी अनेक भरती केली जाते. या भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतात.

महत्त्वाच्या लिंक्स :

इंडियन ऑइल मधील अप्रेंटीस भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

indian oil corporation limitedindian oil jobsiocliocl apprenticeship 2023iocl apprenticeship recruitment 2023IOCL Internshipjobs for iti studentsjobs for ssc or hsc passoutsइंडियन ऑइल अप्रेंटीसइंडियन ऑइल भरती
Comments (0)
Add Comment