मुंबई हायकोर्टमध्ये क्लर्क टायपिस्ट आणि हमाल पदांच्या जागांवर भरती, पगारही उत्तम

Bombay High Court Bharti : महाराष्ट्रातील एकूण ३४ जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक (श्रेणी ३), कनिष्ठ लिपिक व शिपाई पदासाठी एकूण ५ हजार ३७४ रिक्त पदांसाठी भरतीच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या असून, मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण ४१२ रिक्त जागांसाठी हि भरती होत आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. या लेखाद्वारे रिक्त पदांची माहिती दिली आहे.

जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. जाहिरातीमधील भरतीचा तपशील पाहून पात्र असलेल्या पदांसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याच्या जाहिरातीसुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता. त्यातून जाहिरात डाऊनलोड करून जाहिरातीमध्ये दिल्यानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

१८ डिसेंबर २०२३ पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत. याविषयीची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे.

पात्रता :

  • प्रत्येक पदासाठी पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.
  • अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी अधिसूचनेतील पात्रता तपशील वाचवा.

वयोमर्यादा :

० मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे आहे.
० शिवाय, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया :

भरतीसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना स्क्रीनिंग चाचणी, टायपिंग चाचणी आणि मुलाखत यातून जावे लागेल. निवड प्रक्रियेचे तपशील तपासण्यासाठी, अधिसूचना एकदा वाचा.

मिळणार एवढा पगार :

पात्रतेप्रमाणे, प्रत्येक पदासाठी वेतन देखील भिन्न आहे.
निवड झाल्यानंतर, पात्रता आणि पदांनुसार १५,००० रुपये ते ६३,२०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

महत्त्वाचे :

  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक आजूक नमूद करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज १८ डिसेंबर २०२३ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सादर करायचे असून, याविषयीचे सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता.
  • ऑनलाइन अर्जाची लिंक तसेच जाहिरातीचे लिंक खाली दिलेले आहे त्यावर क्लिक करून संबंधित जिल्ह्याची जाहिरात डाऊनलोड करून ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

Bombay High Court Recruitment ची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Bombay High Court च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Bombay high courtbombay high court bhartibombay high court recruitmentbombay high court recruitment 2023bombay high court recruitment 2023 applicationbombay high court stenographer recruitment 2023मुंबई उच्च न्यायालय नोकरी
Comments (0)
Add Comment