यामध्ये पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, विविध विभागातील वैद्यकीय अधिकारी या पदांच्या एकूण २५ हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती २१ आणि २२ डिसेंबर रोजी होणार आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – २० जागा
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – ०२ जागा
वैद्यकीय अधिकारी (सामान्य शस्त्रक्रिया) – ०१ जागा
वैद्यकीय अधिकारी (दंत) – ०१ जागा
वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) – ०४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २८ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात एमबीबीएस, डीएनबी, एमडी असावा. याबाबत विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन : (मासिक)
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – ८६ हजार ते ९० हजार
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – ८७ हजार
वैद्यकीय अधिकारी (सामान्य शस्त्रक्रिया) – १ लाख ४ हजार ९८८
वैद्यकीय अधिकारी (दंत) – १ लाख ४ हजार ९८८
वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) – १ लाख ४ हजार ९८८
नोकरी ठिकाण : मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता : तळमजला, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई ४०००९४.
मुलाखतीच्या तारखा : पडानुसार २१ आणि २२ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भाभा अणु संशोधन केंद्र’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेल्या सर्व अधिकृत अधिसूचना पदनिहाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया: या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. ही मुलाखत प्रक्रिया संबधित दिलेल्या स्थळी २१ आणि २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. मुलाखतीला येताना अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी.