Lava Storm 5G चे ली फीचर्स आणि किंमत
टिपस्टर मुकुल शर्मानं एक्स वर केल्या पोस्टनुसार, Lava Storm 5G स्मार्टफोन १५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६०८० प्रोसेसर मिळेल, असं सांगण्यात आलं आहे. डिव्हाइसमध्ये ८जीबी रॅमसह ८जीबी एक्सपांडेबल रॅम मिळून एकूण १६जीबी रॅमची ताकद मिळवता येईल. टिपस्टरनुसार हा फोन ८ मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह लाँच होईल.
Lava Storm 5G कधी येतोय भारतात
लावा स्टॉर्म ५जी फोन २१ डिसेंबरला भारतात लाँच होईल. ब्रँडनं टीजर व्हिडीओच्या माध्यमातून लाँच डेट सांगितली होती. त्यानुसार डिवाइस वचुर्अल इव्हेंटच्या माध्यमातून दुपारी १२ वाजता लाँच केला जाईल. अॅमेझॉनवर देखील फोनची मायक्रो साइट लाइव्ह झाली आहे म्हणजे फोन एक्सक्लूसिव्हली ह्या प्लॅटफॉर्मवर ऑफर्ससह आणखी कमी किंमतीत विकला जाईल.
Lava Storm 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Lava Storm 5G फोन ६.५ इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ह्यावर १०८० x २४०० पिक्सल रिजॉल्यूशन आणि ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो. मोबाइलमध्ये परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेन्सिटी ६०८० चिपसेट मिळेल, हे ब्रँडनं कंफर्म केलं आहे. हा फोन ८जीबी रॅम + ८जीबी वर्चुअल रॅमसह सादर होईल. तसेच, ह्यात २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. Lava Storm 5G अँड्रॉइड १३ वर आधारित असेल.
Lava Storm 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला जाऊ शकतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.डिव्हाइसमध्ये ५,०००एमएएच बॅटरी आणि १८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.