एकनाथ खडसेंवर ईडीची मोठी कारवाई; जळगाव, लोणावळ्यातील कोट्यवधींची मालमत्ता जप्त

हायलाइट्स:

  • एकनाथ खडसे यांना ईडीचा आणखी एक धक्का
  • जळगाव, लोणावळा येथील मालमत्ता जप्त
  • भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात कारवाई

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेला चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. आता सक्तवसुली संचालनालयानं (ED) खडसे यांची जळगाव व लोणावळ्यातील मालमत्तात जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे ५ कोटी इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. (ED seizes NCP Leader Eknath Khadse’s Property)
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना व राज्यात मंत्री असताना भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरण पुढं आलं होतं. या प्रकरणात खडसे यांना मंत्रिपद गमवावं लागलं. त्यानंतर अनेक वर्षे खडसे राजकीय विजनवासात होते. मागील वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मागील महिन्यात ईडीनं त्यांची तब्बल ९ तास चौकशी केली होती. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर अटकेची कारवाई देखील झाली आहे. आता याच प्रकरणात खडसे यांच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप सरकारच्या काळात महसूलमंत्री असताना खडसे यांनी भोसरी एमआयडीसी येथील एक भूखंड तीन कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केला होता. हा व्यवहार खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावे करण्यात आला होता. या भूखंडाची किंमत ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त असताना त्याचे बाजारमूल्य कमी दाखविण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. नव्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार या जमिनीचे मूल्य दुप्पट म्हणजे ८० कोटी रुपये आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न खडसे कुटुंबीयांनी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. तेव्हापासून खडसे व त्यांचे कुटुंबीय या प्रकरणात अडकले आहेत.

आणखी वाचा:

अमिताभ यांच्या पोलीस बॉडीगार्डची तडकाफडकी बदली; ‘हे’ आहे कारण

नारायण राणेंना योद्ध्याची उपमा; ‘हे’ ट्वीट राज्यभर चर्चेत

Source link

EdED Seizes Ekanth Khadse's PropertyEknath Khadseeknath khadse news todayईडीएकनाथ खडसे
Comments (0)
Add Comment