Motorola Razr 40 Ultra, Razr 40 price in India
Motorola Razr 40 Ultra आणि Razr 40 ची किंमत १७,००० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे, त्यामुळे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर रेजर ४० अल्ट्रा ७२,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे, जो १७,००० रुपयांचा डिस्काउंट होतो. ह्या किंमतीत फोनचा एकमेव ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट येतो. तर Motorola Razr 40 सध्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह ४४,९९९ रुपयांमध्ये लिस्टेड आहे, जो १५,००० रुपयांचा डिस्काउंट आहे.
Ultra मॉडेल इनफिनिट ब्लॅक आणि वीवा मजेंटा रंगात येतो. तर मोटोरोला रेजर ४० सेज ग्रीन, समर लिलॅक आणि वॅनिला क्रीम रंगात सादर करण्यात आला आहे. कंपनी अधिकृत वेबसाइटवर काही बँक डिस्काउंट देखील देत आहे, ज्यामुळे निवडक बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ग्राहक हा डिस्काउंटेड किंमतीच्या वर १,५०० रुपयापर्यंतचा एक्स्ट्रा सुट मिळवू शकतात. तसेच नॉ कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देखील आहे.
Motorola Razr 40 Ultra, Razr 40 specifications
मोटोरोला रेजर ४० अल्ट्रा आणि रेजर ४० दोन्ही Android 13 आधारित MyUX वर चालतात. अल्ट्रा १६५Hz रिफ्रेश रेटसह ६.९-इंच फुल-एचडी+ फोल्डेबल pOLED डिस्प्ले आहे. ह्यात १४४Hz रिफ्रेश रेटसह ३.६-इंच (१,०५६x१,०६६ पिक्सल) pOLED बाहेरचा पॅनल आहे. तर मोटोरोला रेजर ४० मध्ये १४४Hz रिफ्रेश रेटसह ६.९-इंच फुल-एचडी+ pOLED मुख्य डिस्प्ले आणि १.५-इंच OLED बाहेरची स्क्रीन आहे.
Motorola Razr 40 Ultra मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे, तर Razr 40 Snadragon 7 Gen 1 चिपसेट वर चालतो. दोन्ही मॉडेलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहेत. रेजर ४० अल्ट्रा मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सपोर्टसह १२-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १३-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळतो. रेजर ४० मध्ये ६४-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १३-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी दोन्ही हँडसेट मध्ये ३२-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.मोटोरोला रेजर ४० अल्ट्रा मध्ये ३०वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ५ वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ३,८०० एमएएचची बॅटरी आहे. रेजर ४० मध्ये ३३वॉट फास्ट चार्जिंगसह ४,२०० एमएएचची बॅटरी आहे.