एनडीए शिवाय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होणार; सीडीएस हा देशसेवेत दाखल होण्याचा दुसरा पर्याय

CDS Is Alternative to NDA : भारतीय सैन्य, नौदल किंवा हवाई दलात काम करून देश सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते. एनडीए म्हणजे नॅशनल डिफेंस अकादमी आणि त्यांच्या वतीने घेतल्या जाणार्‍या विविध परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते. मात्र, सीडीएस म्हणजेच Combined Defence Services हाही भारतीय संरक्षण, नौदल आणि हवाई दलात अधिकारी बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक वेगळा पर्याय आहे. सीडीएस आणि सीडीएस परीक्षा यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज, जाणून घेऊया एनडीएसाथी पर्यायी मनाली जाणार्‍या सीडीएस विषयी…

सीडीएस परीक्षेला पात्र ठरण्यासाठी ही पात्रता महत्त्वाची :
  • उमेदवार भारतात कायमचे स्थायिक झालेले असावेत.
  • उमेदवार पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षात असावा.
  • परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा १९ वर्षे आहे.
  • उमेदवारांचे वय २० ते २४ वर्षे दरम्यान असावे.
  • पुरुष उमेदवारांची उंची किमान १५७.५ सेमी, नौदलासाठी १५७ सेमी आणि हवाई दलासाठी १६२.५ सेमी असावी.

तीन टप्प्यांमध्ये पार पडते CDS परीक्षा :

लेखी परीक्षा (फेरी १) :
हा पहिला टप्पा आहे आणि त्यात तीन पेपर असतात. गणित, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषा या विषयांचा यात संवेश असतो. ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात सहभागी होता येते.

SSB मुलाखत (फेरी २) :
लेखी परीक्षेनंतर निवडलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत देखील अनेक टप्प्यात विभागली गेली आहे. स्क्रीनिंग राउंड, ग्रुप एक्सरसाइज, ग्रुप एक्सरसाइज इंटरव्ह्यू अशा अनेक फेर्‍यांचा यात समावेश असतो. जर तुम्ही CGS ची तयारी करत असाल तर मुलाखतीचा तपशील नक्कीच मिळवा.

वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणी (फेरी ३) :
यशस्वी मुलाखतीनंतर, उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. कोणत्याही उमेदवाराच्या कागदपत्रात तफावत आढळल्यास ती नाकारली जाईल.

महत्त्वाचे :

  • केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे लेखी परीक्षा घेतली जाते. सेवा निवड मंडळाद्वारे मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी केली जाते.
  • या संपूर्ण प्रक्रियेच्या आधारे पुढील टप्प्यात उमेदवारांची निवड केली जाते आणि त्यांना विविध लष्करी अकादमींमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
  • जर त्यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले तर त्यांना सशस्त्र दलातील अधिकारी म्हणून नियुक्ती मिळते.
  • सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कॅडेट प्रशिक्षण घ्यावे लागते. लष्कर, नौदल किंवा समतुल्य पदावरील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान निश्चित मानधन मिळते.

Source link

cds criteriacds full formcombined defence servicescombined defence services examindian navynda full formSainik Bhartiएनएसडीसीडीएससैन्यभरती
Comments (0)
Add Comment