देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ‘हे’ कधीही बोलणार नाहीतः संजय राऊत

हायलाइट्स:

  • नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन शिवसेना आक्रमक
  • संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
  • भाजप नेत्यांवर केली टीका

मुंबईः ‘सभ्य भाषेत टीका असेल तर स्वीकारली जाईल. टीकेला धार असेल तर तीही स्वीकारली जाईल. तुम्ही कंबरेखालची केली कर याद राखा. कंबरेखाली तुम्हीही आहात. आमच्याशी भाषेशी बरोबरी करु नका. आम्ही लिहणारे बोलणारे आहोत आणि सर्वकाही करणारे आहोत,’ असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.

नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे.

‘कोणी तरी बाहेरचा माणूस येतो शिवसेना भवनावर दगड मारू म्हणतो, कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारू म्हणतो. हे मुळ भाजपचा माणूस बोलणार नाही, हे बाहेरचे बाडगे बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः ”भाजप लाडां’च्या संपत्तीवर ईडीने कब्जा केलेला दिसत नाही’

‘बाहेरून आलेले लोकं हे सगळं बोलतात. महाराष्ट्रात, देशात बांग्लादेशचे घुसखोर आणि पाकिस्तानचे घुसखोर हैदौस घालतात आणि आपण त्यांच्याविरोधात कारवाया करतो. माहौल बिघडवतात. भाजपमधून बाहेरून आलेल्या लोकांनी माहौल बिघडवला,’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

वाचाः एक आठवण! ‘ते’ पोस्टर ट्वीट करत नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

‘राजकारणात यात्रा काढल्या पाहिजेत. लोकांचा पाठिंबा मिळवायचा आहे. पण त्यांना यात्रेचा हेतू कळला नाही.सरकार काय काम करत हे लोकांना सांगा यासाठी यात्रा काढा अशी मोदींची इच्छा आहे. यावेळी संसदेचं कामकाज चाललं नाही. काही कारणांमुळं अनेक गोष्टी लोकांपर्यंत गेल्या नाहीत. त्या लोकांना सांगा असं मोदीचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात जा आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर चिखलफेक करा, असे आदेश मोदींनी दिले नाहीत,’ अशा शब्दांत राऊतांनी भाजपला सुनावले आहे.

वाचाः मुंबईत धोक्याची घंटा; रुग्णसंख्येनं घेतली पुन्हा उसळी

Source link

bjp jan ashirvad yatraChandrkant Patildevendra fadanvisnarayan rane latest newsSanjay Rautनारायण राणेसंजय राऊत
Comments (0)
Add Comment