iQOO Neo 9 Pro इंडिया लाँच टाइमलाइन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर टिपस्टर मुकुल शर्मानं iQOO Neo 9 Pro मोबाइलच्या इंडिया लाँचची माहिती दिली आहे. पोस्टनुसार फोन जानेवारीमध्ये भारतात लाँच होईल. हा स्मार्टफोन चीनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९३०० सह येतील तर भारतात स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपचा वापर केला जाईल. पोस्ट नुसार डिवाइस रेड कलर ड्युअल-टोन डिजाइनसह भारतीय बाजारात येईल.
iQOO Neo 9 सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)
आयक्यूच्या दोन्ही फ्लॅगशिप फोन iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro मध्ये ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्यावर १.५के रिजॉल्यूशन आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. चीनमध्ये iQOO Neo 9 मध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट दिला जाऊ शकतो. तर iQOO Neo 9 Pro मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९३०० चिपसेट मिळू शकतो.
स्टोरेजसाठी १६जीबी पर्यंत रॅमसह १टीबी पर्यंतची स्टोरेज दिली जाऊ शकते. हे दोन्ही मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित ओरिजिन ओएसवर चालू शकतात. iQOO Neo 9 मध्ये ५०००एमएएच आणि iQOO Neo 9 Pro मध्ये ५,१६०एमएएचची बॅटरी १२०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह दिली जाऊ शकते.
नियो सीरीजचे फोन्स OIS सपोर्ट असलेल्या रियर कॅमेरा सेटअपसह येण्याची शक्यता आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स९२० प्रायमरी कॅमेरा आणि एक अल्ट्रा वाइड लेन्स मिळू शकतो. तसेच, सेल्फीसाठी १६एमपीचा कॅमेरा असू शकतो.