महात्मा फुले कृषी विद्यापीठात भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri Recruitment 2023: तुम्ही बीएससी अ‍ॅग्री विषयात पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची एक उत्तम संधी चालून आली आहे. कृषी क्षेत्रातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या अहमदनगर जिल्हयातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरतीद्वारे ‘फील्ड/लॅब -अटेंडन्ट’ या पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ४ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि वेतन याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
फील्ड/लॅब अटेंडन्ट – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार कृषी अभ्यासक्रमात पदवीधर असावा. (B.Sc – Agri./Horti./ Food Science) या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण – राहुरी, जिल्हा – अहमदनगर.

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अन्वेषक, कडधान्य सुधारणा प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर – ४१३७२२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०४ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri vacancyMPKV Bharti 2023MPKV Recruitment 2023recruitmentमहात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती २०२३
Comments (0)
Add Comment