आता भारतीय मोबाइल युजर्स कोणताही पेपर फॉर्म फिल न करता नवीन सिम कार्ड मिळवू शकतात. डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशननं अलीकडेच जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, पेपर आधारित KYC १ जानेवारी २०२४ पासून बंद होणार आहेत. सरकारनं सायबर क्राइम रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे, त्यामुळे बनावट सिम कार्डला आळा बसेल आणि त्याद्वारे होणारे गुन्हे देखील कमी होतील.
त्याचबरोबर सिम सेल पॉइंटच्या देखील माहिती मिळवली जाईल. म्हणजे भविष्यात जर एखादा गुन्हा घडला तर पॉइंट ऑफ सेलपासून त्या प्रकरणाची चौकशी केली जाऊ शकते. म्हणजे ज्या सिम कार्डचा वापर गुन्ह्यांसाठी केला जाईल, त्यांचे विक्रेते देखील सहज ट्रॅक करता येतील. ह्याबाबत सरकारनं ९ ऑगस्ट २०१२ ला एक नोटिफिकेशन जारी केलं होतं, ह्यात पेपर आधारित KYC ला हिरवा कंदील दाखवला होता परंतु आता ही पद्धत अनिवार्य केली आह. ह्यामुळे सिम कार्ड विक्री करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांच्या खर्चात देखील कपात होईल.
परंतु ह्या नवीन नियमांमुळे सिम कार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ह्याचा कोणताही त्रास होणार आहे. फक्त Biometric च्या आधारावर सिम कार्ड इश्यू केलं जाईल. ह्या नियमांमुळे एक गोष्ट मात्र नक्की होईल ती म्हणजे बनावट सिम कार्ड इश्यू होणार नाही. आधी असं होत नव्हतं, उलट आधी कोणाच्याही ओळखपत्रावर कोणालाही सिम कार्ड दिलं जातं होतं. नंतर अश्या सिम कार्ड्सचा वापर गुन्हेगारीसाठी देखील केला जात असे. परंतु आता सरकारनं ह्याबाबत कठोर कारवाई केली आहे.