अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला पाटगावचं पाणी देण्यास गावकऱ्यांचा विरोध, ठिय्या आंदोलन सुरु

कोल्हापूर/सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातील पाणी देण्यास गावातील नागरिकांनी विरोध केला आहे. पाटगाव धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अदानी उद्योग समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाला देऊ नये, अशी मागणी करत पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील माणगाव खोऱ्यातील अंजिवडे गावात उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी कंपनीचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट २१०० मेगाव्हॅटचा वीज निर्मिती प्रकल्प उभा करण्यात येत आहे. या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून प्रकल्प उभारण्याचे काम गुप्तपणे सुरू करण्यात आले आहे. यासाठी १४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन झाले असून त्यापैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा करण्यात येणार आहे.यासाठी अंजीवडे गावाच्या माथ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातून टनेल सदृश पाइपलाइन द्वारे पाणी अंजिवडे येथे उभारल्या जाणाऱ्या जलसाठ्यात सोडले जाणार आहे. मात्र, याला पाटगाव मधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

पाटगाव धरण क्षेत्रामध्ये अनेक गावे असून पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीच्या पाण्यापर्यंत या धरणातील पाण्याचा उपयोग या गावातील नागरिक करतात. मात्र, गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता आणि विश्वासात न घेता या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता कशी दिली? राज्य सरकारने याबाबतचा आपली भूमिका केंद्राकडे मांडली त्यावेळी भुदरगड मधल्या लोकप्रतिनिधींना याची कल्पना होती की नव्हती अशी विचारणा करत गारगोटी येथील क्रांती चौकात तहसीलदार कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
वेध लोकसभा निवडणुकीचा : दावेदारच अधिक, प्रबळ मात्र कमीच, कोल्हापूर लोकसभेची गणिते काय?
यावेळी या आंदोलनात पाटगाव धरण क्षेत्रातील गावकऱ्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर सर, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीने के पी पाटील , शिवसेना ठाकरे गट यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला मात्र यावेळी पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने या आंदोलनात जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पालकमंत्री स्वतः सहभागी होऊन त्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे का नाही आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रकाश पाटील यांनी केली.

तर सरकारने या प्रकल्पासंदर्भात ठोस निर्णय नाही घेतला तर प्रसंगी कोणत्याही टोकाची लढाई करू पण पाटगाव धरणातील एक थेंब ही पाणी या प्रकल्पाला देऊ देणार नाही अशी भूमिका कृती समितीने मांडली आहे. यामुळे येत्या काळात अदानीच्या या प्रकल्पा विरोधात पाटगाव धरण क्षेत्रातील गावकरी आणि सरकार यांच्या संघर्ष निर्माण होण्याचे दाट चिन्ह निर्माण झाले आहेत.
फोटो काढून येईपर्यंत चोरट्यानं डाव साधला, अवघ्या दोन सेकंदात पर्स लंपास, ३५ तोळे सोन्यावर चोरट्याचा डल्ला
दरम्यान या सर्वांवर राधानगरी भुदरगड चे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून अदानी ग्रुपच्या वतीने पाटगाव धरणातील पाणी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, भुदरगड तालुक्यासाठी पाटगाव धरण हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी अनेक लोकांचे योगदान मिळाले आहे. भुदरगड तालुका समृद्ध करण्यासाठी पाटगाव धरणाचा मोठा वाटा आहे. यामुळे या धरणातील पाण्याचा एकही थेंब अदानी किंवा अन्य कोणीही मागितलं तरी न देणं हे आपलं कर्तव्य आहे. सध्या धरणामध्ये पाणीसाठा हा कमी असल्याने आम्ही पाणी देऊ शकत नाही असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धरणातील एक थेंब हे पाणी देणार नाही असे सांगण्यात आले आहे. यामुळे या धरणातील एक थेंब हे पाणी या प्रकल्पाला देणार नाही. या पाण्यावर अधिकार हा फक्त भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा आहे. आणि यामुळे अशा कोणत्याही प्रकारची परवानगी मी आमदार म्हणून मिळू देणार नाही असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
विस्थापितांचा आवाज मांडणाऱ्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमी पुरस्कार, कृष्णात खोत यांच्या लेखनाचा गौरवRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

adani hydro power projectpatgaon dam waterअदानी कंपनीअदानी कंपनी जलविद्युत प्रकल्पकोल्हापूर बातम्यापाटगाव ग्रामस्थपाटगाव धरणपाटगाव धरणातील पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमकप्रकाश आबिटकर
Comments (0)
Add Comment