डोक्यावरील विगने केला भांडाफोड; अधिकाऱ्यांना संशय अन् मुंबई विमानतळावर ८ कोटींचं घबाड सापडलं

मुंबई: ड्रग्ज तस्कर तस्करीसाठी अनेक वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. कधी कोणी गुप्तांगात लपवून ड्रग्ज आणतं, तर कोणी कपड्यांमध्ये लपवतं. पण, तस्कर कितीही प्रयत्न करतील तरी ते अधिकाऱ्यांच्या नजरेपासून वाचू शकत नाही. असंच काहीसं मुंबई विमानतळावर घडलं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एका युगांडीयन महिलेने डोक्याला वीग लावून त्यामध्ये तब्बल आठ कोटी ९० लाख रुपयांचे ड्रग्ज घेऊन जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) पथकाकडून या युगांडीयन महिलेला अटक करण्यात आली आहे.

नेकमं काय घडलं?

एक युगांडीयन महिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करून आली होती. यावेळी या महिलेने डोक्याला विग लावल्याचे आढळून आले. यावेळी महसूल गुप्तचर विभागाला संशय आल्याने त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या महिलेने लावलेल्या विगमध्ये कोकेन नावाच्या ड्रग्जच्या प्लॅस्टिक कव्हरमध्ये ठेवलेल्या छोट्या छोट्या पुड्या आढळून आल्या. या पुड्यांमध्ये ८९० ग्रॅम कोकेन होते. हे ड्रग्स महसूल गुप्तचर विभागाने जप्त केले असून त्याची किंमत ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. तर युगांडा च्या महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ड्रग्ज तस्करीच्या या पद्धतीने अधिकारीही हैराण झाले आहेत. गेल्या काही काळापासून विमानतळावरुन अशा अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे जे वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करुन तस्करी करत होते.

दगडी फुटपाथ अन् मोठे स्लॅब; पाण्याखाली सापडलं ३७५ वर्ष जुनं रहस्यमय शहर, अखेर गूढ उकललं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

chhatrapati shivaji maharaj international airportdrugs smugglingdrugs smuggling from wigmumbai crime newsmumbai newsugandan woman smuggling drugs
Comments (0)
Add Comment