Peach Fuzz कलरची निवड का केली?
जागतिक कलर अथॉरिटी पँटोन दरवर्षी एका रंगला ‘कलर ऑफ दी ईअर’ चा दर्जा देते. त्यानुसार २०२४ साठी पीच फजची निवड करण्यात आली आहे. पीच फझच्या माध्यमातून मानवी संबंधांचे महत्त्व अधोरेखित होते असं सांगण्यात आलं आहे. म्हणून गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मोटोरोलानं पँटोन सोबत भागेदारी करत २०२४ च्या कलर ऑफ दी ईअर’ चा वापर Motorola Razr 40 Ultra आणि Edge 40 Neo मध्ये केला आहे.
युरोपमध्ये उपलब्ध झाले नवीन कलर व्हेरिएंट
Motorola Razr 40 Ultra आणि Edge 40 Neo नव्या Peach Fuzz कलरमध्ये कंपनीच्या युरोपियन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. तर भारतात देखील हे नवीन कलर व्हेरिएंट उपलब्ध होतील अशी माहिती कंपनीनं दिली आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या फक्त रंगात बदल होईल आणि किंमत व स्पेसिफिकेशन्समध्ये फरक असणार नाही अशी अपेक्षा आहे.
सध्या Motorola Razr 40 Ultra चा ८ जीबी रॅम व २५६ जीबी व्हेरिएंट Amazon च्या माध्यमातून ७९,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. Motorola Edge 40 Neo चा ८ जीबी रॅम व १२८ जीबी रॅम व्हेरिएंट Flipkart वर २२,९९९ रुपये आणि १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंट २४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Motorola Razr 40 Ultra
Razr 40 Ultra मध्ये फ्लॅपेबल डिझाइनसह 3.6 इंचांचा बाह्य Poled डिसप्ले आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 1100 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. घडी उघडल्यानंतर ह्या फोनचा सुमारे 6.9 इंचांचा डिसप्ले मिळतो, जो 165Hz रिफ्रेश रेट आणि 1400 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी ह्या फ्लिप फोनमध्ये शक्तिशाली स्नपॅड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट मिळेल.
मोटोरोला Edge 40 Neo
मोटोरोला Edge 40 Neo मध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे. ह्या फोनचा 144Hz 6.55 इंचांचा pOLED कर्व्ह्ड डिसप्ले मिळतो. मोटोरोला edge 40 neo मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7030 चिपसेट मिळतो. सेगमेंटमध्ये ह्या फोनमध्ये सर्वाधिक 14 5G बँड्सचा सपोर्ट मिळतो.