काय आहे नेमकी संपूर्ण घटना?
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तसेच मिळालेल्या माहितीनुसार, अकोला पोलिस दलात रामदास पेठ पोलिस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे (पोलिस कर्मचारी) हा कार्यरत होता. यादरम्यान, त्याची एका पोलिस कर्मचाऱ्यांशी चांगली मैत्री झाली. शिवम त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या म्हणजेच आपल्या मित्राच्या घरी येणं जाणं होतं. याचदरम्यान, त्याने मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली होती. शिवम या नराधम पोलिस कर्मचाऱ्यानं मित्राच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तिने ते मंजुरी केली आणि तिथून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
कालांतरानं शिवम मित्राच्या पत्नीला म्हणजेच पीडित महिलेला ब्लॅकमेल करू लागला. हा प्रकार तिने पतीला सांगितला आणि लागलीच आकोट शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सद्यस्थितीत शिवमवर आकोट शहर पोलिस ठाण्यात ५२६/२०२३ कलम ३५४, ३५४ (अ) ३५४ (ड) ३७६(१) (ए)३७६(२) (न) ३७६ (३) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास एपीआय योगिता ठाकरे करीत आहेत.
अकोला-अमरावतीतही तिच्यावर अत्याचार–
तक्रारीत म्हटलं आहे की शिवमने पीडित महिलेसोबत फेसबुकदवारे मैत्री संपादन करून प्रेमसंबंध केले. त्यातून शारीरीक संबंध ठेवून भोळेपणाचा फायदा घेत फीस ब्लॅकमेल केलं. तिच्या इच्छेविरुध्द दोन ते तीनदा शारीरिक संबंधही प्रस्थापित केले, अशा तक्रारीवरुन सदरचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान शिवमनं पंडित विवाहित महिलेवर तिच्या राहत्या घरी तसेच अमरावती येथे नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच, रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत देखील पीडित महिलेवर शिवमने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यान, अकोट पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवम हा फरार झाला असून आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचा पोलिस शोध घेत आहे.
पण, अद्याप आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही. आरोपी पोलिस खात्यात असल्याने पोलिस दलाची बदनामी होईल, या भीतीने पोलिस परिपूर्ण माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचेही दिसून आले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News