ट्रॅक्टरला ओव्हरटेक करुन अडवताच वाळूमाफियाची मुजोरी, प्रांताधिकाऱ्यांच्या कारला धडक

जळगाव : राज्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढल्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. असाच एक धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडला. येथील प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे त्यांच्या खासगी वाहनाने (एमएच २० एफवाय ०२१६) घरी परतत असताना वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात प्रांतधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी, की प्रांताधिकारी भंगाळे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून दुपारी साडेतीन वाजेदरम्यान पत्नी आणि मुलीसह चोपडा येथे परत येत होते. यावेळी खडगाव येथे एक ट्रॅक्टर अवैध पद्धतीने वाळू नेताना त्यांना आढळला. त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना ही माहिती सांगितली. यानुसार तलाठी पावरा यांनी त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करीत ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने उलट तलाठी गुलाबसिंग पावरा यांना शिवीगाळ करून ‘तू साइडला झाला नाही तर तुला उडवून देईन’ अशी धमकी दिली.

याचदरम्यान प्रांताधिकारी भंगाळे यांनी त्यांच्या कारचा वेग वाढवून या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टरचालक राजेश विकास मालवे (वय २३, रा. खरग, ता. चोपडा) याने प्रांताधिकारी यांच्या कारला धडक दिली.

हिंदू धर्मानुसारही ठाकरे गटच योग्य, कामतांच्या युक्तिवादात गौतम ऋषींच्या न्यायसूत्रांचा दाखला
सदर घटना मंगळवारी दि. १९ दुपारी खडगावजवळ घडली. या धडकेमुळे प्रांताधिकाऱ्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे, तर वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहेत.

Dawood Ibrahim News : दाऊद १००० टक्के ठणठणीत, विषबाधेच्या चर्चा निराधार, छोटा शकीलने ‘मृत्यूचर्चे’तील हवा काढली
दरम्यान, प्रांताधिकारी भंगाळे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्याविरोधात कलम 353, 332, 379, 504, 506, 527 व महसूल अधिनियम कलम 48 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वाळू टिप्परचा जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला कट, साडे ३ किमी फरफटलं; अंगरक्षकाने सांगितला थरारक प्रसंग

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

jalgaon government officer car crushjalgaon prantadhikari car crushsand mafiavalu mafiaजळगाव चोपडा वाळूमाफियाजळगाव प्रांताधिकारी चिरडण्याचा प्रयत्नजळगाव बातम्याजळगाव सरकारी अधिकारी चिरडलेवाळू माफिया प्रांताधिकारी कार चिरडलेवाळू माफिया मुजोरी
Comments (0)
Add Comment