iQOO 12 Vs OnePlus 12 किंमत
आयकू १२ चा १२जीबी रॅम व २५६जीबी व्हेरिएंटची किंमत ५२,९९९ रुपये आहे. तर फोनचा १६जीबी रॅम व ५१२जीबी व्हेरिएंटची किंमत ५७,९९९ रुपये आहे.
वनप्लस १२ चा १२जीबी व २५६जीबी स्टोरेजची किंमत ४,२९९ युआन (जवळपास ५०,६०० रुपये), १६जीबी व ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,७९९ युआन (जवळपास ५६,५०० रुपये) आहे. भारतात आल्यानंतर ही किंमत बदलू शकते.
iQOO 12 vs OnePlus 12: कोणाचा डिस्प्ले आहे चांगला?
iQOO 12 मध्ये १२६० × २८०० पिक्सल रेजोल्यूशनसह ६.७८-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा LTPO AMOLED फ्लॅट पॅनल १.५के रिजोल्यूशन, १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३०००निट्स पीक ब्राइटनेस, २१६०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग, ४२५पीपीआय पिक्सल डेन्सिटी आणि वेट टच फिचरला सपोर्ट करतो. ह्यात इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
वनप्लस १२मध्ये ६.८२-इंचाचा क्वॉडएचडी+ २के ओएलईडी एलटीपीओ डिस्प्ले आहे ज्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४,५०० निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेस आहे. हा सर्वात जास्त ब्राइटनेस असलेला स्मार्टफोन असल्याचा दावा करण्यात आला आहे.
iQOO 12 vs OnePlus 12: कोणाची परफॉर्मन्स आहे दमदार?
दोन्ही फोनमध्ये आता पर्यंतचा सर्वात वेगवान क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट देण्यात आला आहे. हा पावरफुल ३.३ गिगाहर्टझ हाय क्लॉक स्पीडवर चालतो. ह्या प्रोसेसर बद्दल दावा आहे करण्यात आला आहे की हा जुन्या स्नॅपड्रॅगन ८ जेन २ च्या तुलनेत ३० टक्के फास्ट आहे.
iQOO 12 vs OnePlus 12: कोणाचा कॅमेरा आहे शानदार?
iQOO 12 च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह ५०-मेगापिक्सलचा ओमनीव्हिजन प्रायमरी सेन्सर, ५०-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, ३एक्स ऑप्टिकल झूम आणि १००एक्स डिजिटल झूम असलेला ६४-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आहे. सोबत सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
तसेच, OnePlus 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात OIS सह ५०मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ४८ मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स आणि ३एक्स पेरिस्कोप झूम लेन्ससह ६४ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ३२मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
iQOO 12 vs OnePlus 12: बॅटरी बॅकअप कोणाचा चांगला?
iQOO 12 मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन १२० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हा फोन २७ मिनिटांत ० ते १०० टक्के चार्ज केला जाऊ शकतो.
वनप्लस १२ मध्ये ५० वॉट वायरलेस फास्ट चार्जिंगसह ५,४००एमएएचची बॅटरी आणि १०० वॉट वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.