ठाकरेंच्या काळात रस्त्याची कामे करणाऱ्या कंपनीला आरोग्य कंत्राट, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

नागपूर : ‘उत्तर प्रदेशातील रस्ते बांधणीची कामे करणाऱ्या एका कंपनीला ठाकरे यांच्या निकटवर्तीयामार्फत करोनाच्या काळात ऑक्सिजन प्लांट; तसेच पेंग्विन पार्कची कंत्राटे देण्यात आली,’ असा गौप्यस्फोट करतानाच, ‘या लोकांमुळे सर्वसामान्यांची आरोग्य व्यवस्था रस्त्यावर आली,’ असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत केला.

विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत करोनाकाळात झालेला कथित भ्रष्टाचार; तसेच कंत्राटांमधील कथित घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकारमधील गैरव्यवहाराचा उल्लेख करून विरोधी पक्षाला अडचणीत आणले. ‘कफन चोर, खिचडी चोर अशी बिरुदे कमी पडतील एवढा मोठा भ्रष्टाचार करोनाकाळात झाला आहे. यात काही लोकांच्या कृपेने टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी तळपली. रस्ते बांधणीचे मुख्य काम सोडून ‘रोमिंग पॉवर ऑफ अॅटर्नी’ देऊन या कंपनीने मुंबई महापालिकेत २७० कोटी रुपयांची ५७ कंत्राटे घेतली. ‘यात रोमिन छेडा ही महत्त्वाचा व्यक्ती आहे,’ असेही शिंदे म्हणाले.

भुयारी मेट्रो अडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतरही डेडलाइन चुकण्याची चिन्हे, कारण…
‘पेंग्विनपासून सुरुवात’

‘जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून याची सुरुवात झाली. या कंपनीला पेंग्विन पार्कचे कंत्राट दिले. प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे कामही दिले. छेडा याचे बोरिवलीमध्ये परिहार स्टोअर्स नावाचे कपड्याचे दुकान होते. या कंत्राटात हायवे कंपनीला दोन टक्के पैसे देऊन उर्वरीत सर्व पैसे छेडा याच्या खात्यात गेले. जुलै महिन्यात प्राणवायू प्रकल्पाचे काम पूर्ण करायचे असताना ते ऑक्टोबर महिन्यात पूर्ण केले. पण हे काम एक महिना आधीच म्हणजे ऑगस्टमध्ये पूर्ण झाल्याचे दाखवले. ऑक्टोबर महिना धरला, तर कामाच्या विलंबासाठी कंपनीला तीन महिन्यांसाठी नऊ कोटी रुपये दंड आकारणे आवश्यक होते. पण प्रत्यक्ष तीन कोटी रुपयांचा दंड करण्यात आला. ऑगस्टमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचे दाखवले. याच दाखल्याच्या आधारावर पुढचे ८० कोटीचे काम त्याला देण्यात आले,’ असा दावा शिंदे यांनी केला.

कामांची जंत्री

‘रस्ते बांधणाऱ्या कंपनीला रोबोटिक झू, फाय डी थिएटर, प्रशासकीय कार्यालय, प्राणी, पक्षी पिंजरे, पेंग्विन कक्षाची निगा आणि देखरेख अशी कामे देण्यात आली. या कंपनीला नंतर महापालिका शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम, पालिकेचे जुहू येथील रुग्णालय आणि जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयाच्या हाउस किपिंगचे; तसेच पालिकेच्या विविध रुग्णालयांत एसी युनिटच्या देखभालीचे कामही दिले,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एसटी कंडक्टरचा प्रामाणिकपणा! लाखोंच्या ऐवजासह पिशवी महिलेला परत केली; सर्वत्र कौतुक

‘माझ्याविरोधात पडद्याआड प्रयत्न’

‘आघाडी सरकारच्या काळात मी मराठा उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणून पडद्याआड प्रयत्न झाले. मी अध्यक्ष झालो, तर मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी काम करीन, ही भीती त्यावेळच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाण यांना होती. मी तेव्हा अध्यक्ष असतो, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, हे मी छातीठोकपणे सांगतो,’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ‘तुमच्या आदर्श कारभारामुळे ‘आदर्शपर्व’ चमकले; पण मराठा पर्व अंधारात ठेवले,’ अशी टीकाही त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली.

‘खिचडीचे वजन कमी’

‘३०० ग्रॅमची खिचडी कमी करून ती १०० ग्रॅम दिली. धक्कादायक म्हणजे हे काम करताना पात्रतेसाठी ज्याचे किचन दाखवले, ते पर्शियन दरबार हॉटेल मालकाचे होते. त्याला याविषयी काहीच माहिती नव्हते. हे सगळे चौकशीत पुराव्यासह बाहेर येणार आहे,’ असा इशारा शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.

कोट

‘आदित्य राजा’च्या कृपेने ‘वरुण राजा’ने टेंडरचा पाऊस पाडला. सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी आणि जनतेने फिरावे दारोदारी अशी अवस्था होती. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा अरेबियन नाइटमधील कथांपेक्षाही सुरस असून, त्या ‘कॅग’ आणि ‘ईडी’मार्फत बाहेर आल्या.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आम्ही सांगितल्यानंतर हेडलाईन दया, अजितदादांचे चिमटे

Source link

aditya thackerayEknath Shindemumbai newsUddhav Thackerayआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमुंबई महानगरपालिका
Comments (0)
Add Comment