iQOO 12 ची किंमत
आयकू १२ च्या बेस मॉडेलमध्ये १२जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जो ५२,९९९ रुप्यानमध्ये खरेदी करता येईल. तर फोनचा १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट ५७,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला आहे. HDFC आणि ICICI बँक कार्डधारकांना ह्या हँडसेटच्या खरेदीवर ३,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
iQOO 12 चे स्पेसिफिकेशन्स
iQOO 12 मध्ये १२६० × २८०० पिक्सल रेजोल्यूशनसह ६.७८-इंचाचा LTPO AMOLED फ्लॅट डिस्प्ले आहे. जो १.५के रिजोल्यूशन, १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३०००निट्स पीक ब्राइटनेस, ४५२ पीपीआय, २१६०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग आणि वेट टच फिचरला सपोर्ट करतो. ह्यात इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
हा डिव्हाइस भारतातील पहिला फोन आहे ज्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. सोबत Adreno 750 जीपीयू ग्राफिक्ससाठी देण्यात आला आहे. त्याचबरोबर १६जीबी पर्यंत रॅम व ५१२जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
iQOO 12 च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह ५०-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ५०-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, ३एक्स ऑप्टिकल झूम आणि १००एक्स डिजिटल झूमसह ६४-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो.
iQOO 12 मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी मिळते जी १२०वॉट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फक्त २७ मिनिटांत ० ते १०० टक्के फुल चार्ज होऊ शकतो. तसेच फोनमध्ये गेमिंगसाठी खास Q1 डिस्प्ले चिप, आयपी६४ रेटिंग, वाय-फाय ७, ६के व्हीसी फोर-झोन कूलिंग सिस्टम, ड्युअल सिम ५जी, ब्लूटूथ ५.४, एनएफसी, ड्युअल-फ्रिक्वेन्सी जीपीएस, आयआर ब्लास्टर, ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि हॅप्टिक फीडबॅकसाठी एक्स-अॅक्सिस लीनियर मोटर देण्यात आली आहे.