‘अत्याचारी मुघल बादशाहांचं कौतुक करणारं वक्तव्य कबीर खानने मागे घ्यावं’

मुंबईः दिग्दर्शक कबीर खानने अत्याचारी मुघल बादशहाबद्दल केलेले विधान त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. द एम्पायर नावाची वेब सिरीज लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीजवरुन मोठा वाद रंगला आहे. अनेकांनी तर हॉटस्टारवर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. राम कदम यांनीही दिग्दर्शक कबीर खान यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राम कदम यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ‘ज्या मुघल बादशाहांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. रक्तपात करत लूटमार केली, लोकांवर अत्याचार करत छळ केले. मंदिरं तोडली, धर्मशाळांचा विद्ध्वंस केला, त्या मुघलांचा जयजयकार आण प्रशंसा या वेब सीरीजमध्ये केली आहे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत जे मुघल बादशाह भारतात येऊन लूट करतात, त्याचं कौतुक या भूमीत कसं होऊ शकतं?, आमचा या वेब सिरीजला विरोध आहे. त्याच्यावर कायमची बंदी घालायला हवी, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

‘प्रत्येक पक्षात असे अनेक खडसे आहेत; अंजली दमानियांचे सूचक ट्वीट

‘दिग्दर्शक कबीर खान म्हणतात की या आक्रमणकारी मुघल बादशाहांचा भारताच्या निर्मितीत, देशहितामध्ये फार मोठा वाटा आहे. ज्या लोकांनी भारतात लूट केली, त्यांचा भारताच्या निर्मितीत वाटा? हे विधान न पटणारं आहे. कोणाला चित्रपट-मालिका बनवायची असेल, तर आमच्या शिवरायांवर बनवा, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रतापसिंग यांच्यावर बनवा. पण अशा प्रकारचं विधान आम्हाला मान्य नाही. अत्याचारी मुघल बादशाहाबद्दल कौतुकाने केलेले विधान त्वरित मागे घ्यावे,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे-नारायण राणे एकत्र येतील, एका ताटात जेवतील!; ‘या’ नेत्याचा दावा

Source link

empire hotstarempire web serieskabir khan latest newsram kadamराम कदम
Comments (0)
Add Comment