काय आहे ह्या मागील विज्ञान
ह्यासाठी हिऱ्यातील ‘कलर सेंटर्स’ खूप महत्वाचे आहेत जिथे हिऱ्यातील छोटे दोष एक स्पॉट बनवतात जो प्रकाश शोषून घेऊ शकतो. ह्या फिचरचा वापर करून संशोधकांनी हिऱ्यातील त्या ठिकाणी अनेक इमेजेस साठवून ठेवल्या. एका मायक्रोस्कोपिक स्पॉटमध्ये वेगवेगळ्या अणूंमध्ये वेगवेगळी माहिती साठवून ठेवण्यासाठी थोड्या वेगळ्या रंगाच्या लेजरचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे लाइटचा कलर अड्जस्ट करून कमी जागेत जास्त डेटा स्टोर करण्यात रिसर्चर्स यशस्वी झाले आहेत.
वारंवार साठवता येईल डेटा
सीसीएनआयनं शोधून काढलेली पद्धत फक्त एकदा डेटा स्टोर करून ठेवत नाही तर हिऱ्यातील दोषांमधे साठवून ठेवलेला डेटा डिलीट करता येतो आणि नवीन डेटा देखील साठवता येतो. ह्या नव्या टेक्निकमुळे एका अणू मध्ये देखील डेटाचे छोटे बिट्स साठवता येतो. ह्या पद्धतींमध्ये एक चौरस इंच जागेत २५ जीबी डेटा साठवता येतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर पोस्ट स्टॅम्प पेक्षा कमी जागेत एखाद्या ब्लु रे डिस्क पेक्षा जास्त डेटा राहू शकतो.
हिऱ्याच्या वापरामुळे किंमत वाढणार नाही का?
डेटा स्टोरेजसाठी हिऱ्यांचा वापरामुळे खर्च वाढेल हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. परंतु ह्यावर देखील एक उपाय संशोधकांनी सांगितलं आहे. डेटा स्टोरेजसाठी प्रयोगशाळेत बनलेल्या हिऱ्यांचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे डेटा स्टोरेजचा खर्च कमी होईल.
विशेष म्हणजे सध्या डेटाचा वापर इतका वाढला आहे की तो साठवून ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जात आहेत. ह्यासाठी वेगवेगळ्या मटेरियल्सचा वापर केला जात आहे. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्टच्या प्रोजेक्ट सिलिकामध्ये ‘quartz glass’ चा वापर क्लाऊड स्टोरेजसाठी कसा करता येईल, ह्यावर संशोधन सुरु आहे. ग्लास म्हणजे काचेच्या ड्युरेबलीटीमुळे मोठ्या प्रमाणावरील डिजिटल डेटा दीर्घकाळ साठवून ठेवणं सोपं होईल.