वनप्लसनं ‘स्मूद बियॉन्ड बिलीफ’ लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून इव्हेंट आयोजित करत आहे, ज्यातून नवीन प्राेडक्ट सादर करत असते. २३ जानेवारीला होणारा इव्हेंट नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात आयोजित केला जाईल. संध्याकाळी ५.३० वाजता गेट ओपन केले जातील.
वनप्लस प्रेमी ह्या इव्हेंट मध्ये सहभागी होऊ शकतील. यासाठी ३ जानेवारी पासून कम्युनिटी तिकीट्स विकल्या जातील. ज्या लोकांना इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांना PayTM Insider आणि OnePlus.in वर बुकिंग करावी लागेल. रेड केबल क्लब मेंबर्सना ५० टक्के डिस्काउंटसह तिकीट घेता येईल. तिकिटांच्या किंमतीचा आणि कॅटेगरीज खुलासा अद्याप करण्यात आला नाही, ही माहिती बुकिंग सुरु झाल्यावर मिळेल.
वनप्लस १२ चे स्पेसिफिकेशन्स
चीनमध्ये लाँच झालेल्या वनप्लस १२ मध्ये ६.८२ इंचाचा कर्व्ड OLED QHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन ३१६८ x १४४० पिक्सल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसरसह आला आहे. फोनमध्ये ५,४००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी १००वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तसेच ही ५० वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनच्या मागे OIS सपोर्टसह ५०एमपी सोनी एलवायटी-८०८ प्रायमरी कॅमेरा, ६४एमपी ओम्नीव्हिजन ओव्ही६४बी कॅमेरा आणि ऑटोफोकस सपोर्टसह ४८एमपी सोनी आयएमएक्स५८१ अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला ३२एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर आधारित कलरओएस १४ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.