दरम्यान, उमेदवारांना या भरतीसाठी १८ डिसेंबरपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. परंतु, दुपारी दोन वाजेपासूनच अधिकृत वेबसाइट चालत नव्हती. सातत्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पेमेंट होत नव्हते, तसेच काहींचे पेमेंट मध्येच अडकले. अशा बऱ्याच अडचणींना उमेदवार सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे राहून गेल्याने उमेदवारांकडून अर्ज करण्याची मुदत वाढवण्याबाबात विनंती करण्यात येत आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1736743946729226716?s=20
आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत आपल्या ट्वीट (एक्स) अकांऊटवर ट्वीट केलं आहे. ते म्हणतात की, जिल्हा न्यायालयातील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख (१८ डिसेंबर) होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुदत असताना दिवसभरात वेबसाईट सर्व्हर डाऊन असल्याने हजारो विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाहीत. परीक्षा घेणारी एजन्सी #TCS असून संबंधित एजन्सीने आणि शासनाने विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदत वाढवून द्यावी, ही विनंती!, अशा आशयाचं ट्वीट रोहित पवांरांनी देखील केलं आहे.
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : ४,६२९ जागा
या पदांमध्ये शिपाईच्या १,२६६ जागा,
कनिष्ठ लिपिकाची २,७९५ जागा, आणि
लघुलेखकाच्या ५६८ जागा आहेत.
पात्रता :
प्रत्येक पदासाठी पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.
अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी अधिसूचनेतील पात्रता तपशील वाचवा.
वयोमर्यादा :
मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे आहे.
शिवाय, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया :
भरतीसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना स्क्रीनिंग चाचणी, टायपिंग चाचणी आणि मुलाखत यातून जावे लागेल. निवड प्रक्रियेचे तपशील तपासण्यासाठी, अधिसूचना एकदा वाचा.
मिळणारा पगार :
पात्रतेप्रमाणे, प्रत्येक पदासाठी वेतन देखील भिन्न आहे.
निवड झाल्यानंतर, पात्रता आणि पदांनुसार १५,००० रुपये ते १,२२,८०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.