कोणत्या युजर्सना मिळणार नाही सपोर्ट
जर तुम्ही जुनं व्हर्जन असलेली अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आधारित स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्या फोनमध्ये कॅलेंडर अॅप चालणार नाही. रिपोर्टनुसार, जर तुमचा स्मार्टफोन अँड्रॉइड ७.१ किंवा त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असेल तर तुमच्या फोनमध्ये कॅलेंडर अॅप्स नाहीत.
का बंद केला सपोर्ट
रिपोर्टनुसार, गुगलनं कॅलेंडर अॅपचा सपोर्ट बंद करण्याचे महत्वाचे कारण सिक्योरिटी सांगितलं आहे. कारण जुने व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर नवीन अपडेट देणं कठीण होत जातं. त्यामुळे हॅकर्स अश्या डिव्हाइसला सहज हॅक करून त्यातील डेटा चोरी करू शकतात. हे टाळण्यासाठी गुगलनं जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या डिव्हाइसवर कॅलेंडर अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ह्यावर उपाय काय
जर तुम्हाला कॅलेंडर अॅप वापरायचा असेल तर सर्वप्रथम तुमचा स्मार्टफोन अपडेट करून घ्या. तुमच्या डिव्हाइसवर लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करा. त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन सिस्टम अपडेटचा पर्याय शोधावा लागेल. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट होत नसेल तर नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन विकत घेणं उत्तम. कारण जुने अँड्रॉइड स्मार्टफोन सुरक्षेच्या दृष्टीने चांगले मानले जात नाहीत.
कोणते अॅप्स गुगलनं हटवले?
ESET रिसर्चरनं हे अॅप्स शोधून काढले जे युजर्सची फसवणूक करत होते. हे अॅप्स आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि साउथ ईस्ट आशियातील युजर्सना टारगेट करत होते. ह्याबाबत जेव्हा गुगलला माहिती मिळाली तेव्हा त्यावर कारवाई करत हे १८ अॅप्स हटवण्यात आले. आता ज्या युजर्सनी हे अॅप्स डाउनलोड केले आहेत त्यांनी हे त्वरित हे डिलीट केले पाहिजेत.
AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash