Lava Storm 5G ची किंमत
लावानं आपल्या नवीन 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतीय बाजारात आणला आहे, ज्यात ८जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज दिली आहे, हा फोन १४,९९९ रुपयांमध्ये विकला जाईल. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हा डिव्हाइस अॅमेझॉन १३,४९९ रुपयांमध्ये विकला जाईल. तसेच बँक ऑफरमध्ये आणखी १,५०० रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे Lava Storm 5G ची किंमत ११,९९९ रुपये होईल. डिवाइसची विक्री २८ डिसेंबरपासून दुपारी १२:०० वाजता सुरु होईल. स्मार्टफोन ग्रीन आणि थंडर ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे.
Lava Storm 5G चे स्पेसिफिकेशन्स
Lava Storm 5G मध्ये कंपनीनं ६.७८ इंचाचा एचडी + डिस्प्ले दिला आहे, जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६०८० चिपसेट मिळतो. सोबत ८जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर ८जीबी एक्सपांडेबल रॅमच्या मदतीनं १६जीबी पर्यंत रॅमची पावर मिळवता येईल.
Lava Storm 5G ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळते. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
डिवाइस ५०००एमएएच बॅटरी आणि दमदार ३३वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइलमध्ये ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स मिळतात. Lava Storm 5G अँड्रॉइड १३ वर चालतो. त्याचबरोबर फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, फ्री होम सर्व्हिस अश्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत.