घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पर्यंती ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या संपताबाई लक्ष्मण नरळे व नंदूबाई भिकू आटपाडकर (वय-५८) यांचे गावात ग्रामपंचायत शेजारी छोटे किराणा दुकान आहे. त्या दुकानाच्या शेजारी असणाऱ्या खोलीत त्या वास्तव्यास होत्या. संपताबाई आणि नंदूबाई आटपाडकर या दोघेही विधवा असून संपताबाई यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत, तर नंदूबाई आटपाडकर यांना दोन सावत्र मुले आहेत.
गुरुवारी सकाळी संपताबाई यांची नात ही आजीला हाक मारत आली असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी तिला संपताबाई यांच्या राहत्या खोलीशेजारीच असलेल्या किराणा दुकानाचे शटर थोडेसे उघडे दिसले. त्यातून तिने डोकावून पाहिले असता तिची आजी व आत्या या दोघेही मृतावस्थेत असल्याच्या आढळून आल्याने तिने आरडाओरडा केला. त्यामुळे तिच्या घरचे धावत येऊन त्यांनी ही घटना पाहिली.
याबाबत तिच्या घरच्या मंडळींनी पोलीस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी म्हसवड पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक, फॉरेन्सिक लॅबची टीम यावेळी उपस्थित होती. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या पोलीस शोध घेत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News
साताऱ्यात दुहेरी खून प्रकरणामुळं खळबळ, मायलेकीला संपवलं, पोलीस घटनास्थळी, तपास सुरु
सातारा : माण तालुक्यातील म्हसवड हद्दीतील पर्यंती येथे मायलेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून केला. ही घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५) आणि नंदूबाई भिकू आटपाडकर (वय ५८) रा. पर्यंती, ता. मान, जि. सातारा) अशी दोघी मायलेकींची नावे आहेत.