जळगावातील वंदना पाटील हत्येचा झाला उलगडा

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

जळगाव:शहरातील रामेश्वर कॉलनीजवळील तुळजाई नगरात आज सकाळी महिलेची हत्या झाली. वंदना गोरख पाटील असे हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव असून या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली. या खून प्रकरणाचा उलगडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे अन्वेशण विभागाला यश आले आहे. काही तासांतच लागलेल्या या तपासामुळे पोलिस पथकाने सुस्कारा सोडला आहे.वंदनाचा पती मयत झाल्यानंतर तिचे सुरेश सुकलाल महाजन याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
सुरेश हा भाजीपाला मार्केटमधे हमालीचे काम करत होता,ती त्याठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी येत होती,दररोज दोघांची नजरानजर होत असल्यामुळे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले,संपर्कातून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते,बघता बघता सुमारे २१ वर्षांचा कालावधी लोटला,दोघांचे प्रेमसंबंध आता लपून राहिले नव्हते,सुरेश विवाहीत होता,तरी तिचे त्याच्या घरी नेहमी येणे जाणे होते. दोघांचे प्रेमसंबंध त्याच्या घरात त्याची पत्नी व मुलांना माहिती झाले होते.दरम्यान वंदनाचे कुणाशी तरी प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा सुरेश याला संशय होता,या प्रकाराला त्याचा विरोध होता,तिला कुणाशी तरी फोनवर बोलत असतांना सुरेशने पकडले होते असा सुरेशचा आरोप आहे,मात्र तिने फोनवर बोलणा-याचे नाव त्याला सांगितलेच नाही,सुरेशने आपल्यासोबत असलेले संबंध संपुष्टात आणावे यासाठी ती त्याच्याशी व्यवस्थित वागत नव्हती,ती त्याला अतिरिक्त पैशांची मागणी करत होती,गेल्या कित्येक वर्षांपासून सुरेश तिचा सर्व खर्च पेलत होता. तसेच त्यांचे संबंध समाजात सर्वांना माहिती होते.असे असतांना तिने अन्य कुणासोबत प्रेमसंबंध असल्यास आपली सर्वत्र बदनामी होईल या विचाराने सुरेश माञ अस्वस्थ झाला होता.

या गोष्टीचा राग आल्याने संतापात त्याने मध्यरात्री वंदनाचा खून केला आहे. खूनाची घटना समजताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरण बकाले यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. त्यासोबतच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी देखील हजर झाले होते. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयीत आरोपीचे नाव निष्पन्न केले होते. हा गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री झाल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील, पोलिस चालक इम्तीयाज खान यांच्या पथकाने त्याला चोपडा येथून ताब्यात घेतले. चोपडा येथून जवळपास तिन कि.मी.अंतरावर असलेल्या महादेव मंदीरात तो लपून बसला होता. त्याचा शोध घेण्याकामी चोपडा येथील पोलिस मित्र मुक्तार शेख याने पोलिस पथकाला तिन मोटार सायकल उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे त्याला शिताफीने ताब्यात घेण्याकामी पथकाला मोलाची मदत झाली.

सुरुवातीला त्याने वंदना कोण? मी तिला ओळखत नाही अशी सुरुवात केली. मात्र लवकरच त्याने आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार, राजेंद्र कांडेकर करत आहेत. आरोपीस अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Comments (0)
Add Comment