एम्समध्ये १९६ पदांसाठी भरती, एमबीबीएस गुणांच्या आधारे होणार निवड; ५० हजारांपेक्षा जास्त पगार

AIIMS Bharti 2023 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने यांनी जानेवारी २०२४ साठी कनिष्ठ निवासी (अ-शैक्षणिक) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. एम्सच्यावतीने भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून, उमेदवार अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. सदर भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या तब्बल १९६ जागांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. AIIMS मधील या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला १३ डिसेंबर २०२३ पासून सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
  • उमेदवारांनी MBBS/BDS (इंटर्नशिप पूर्ण करण्यासह) किंवा MCI/DCI द्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • DMC/DDC नोंदणी असणे अनिवार्य आहे.
  • जे AIIMS मध्ये ज्युनियर रेसिडेन्सी (गैर-शैक्षणिक) मध्ये रुजू झाले होते आणि ज्यांच्या सेवा अनधिकृत गैरहजेरीमुळे किंवा इतर कोणत्याही अनुशासनात्मक / कारणांमुळे संपुष्टात आल्या होत्या ते या पदांसाठी अपात्र असतील.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची ज्युनियर रेसिडेन्सी साठी MBBS परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड केली जाईल (जर AIIMS MBBS उमेदवार असेल).
  • नॉन AIIMS, नवी दिल्ली MBBS पदवीधरांसाठी, ते जानेवारी 2024 सत्रातील INI-CET PG प्रवेश परीक्षेत मिळालेल्या रँकवर आधारित असेल.

पगार:

उमेदवारांना स्तर १० अंतर्गत ५६,१०० रुपये पगार दिला जाईल. याशिवाय, सामान्य भत्त्याचाही लाभ मिळणार आहे.

वयोमर्यादा :

अर्ज करण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेली कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाईल. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक माहिती तपासू शकतात.

तुम्ही असा अर्ज करू शकता :

– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– आता कनिष्ठ निवासी (अ-शैक्षणिक) लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– फॉर्म भरा आणि फी भरा.
– आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

महत्त्वाच्या लिंक्स :

एम्स भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
एम्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

AIIMS recruitment 2023delhiएम्स जॉबएम्स भरतीएम्स भर्ती 2023एम्स भर्ती 2023 पात्रताएम्स भर्ती 2023 शेड्यूलदिल्लीसरकारी नौकरी
Comments (0)
Add Comment