Narayan Rane: ठाकरे-फडणवीस भेटीवर नारायण राणे यांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले…

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री ठाकरे व फडणवीस भेटीवर राणे बोलले.
  • अशा भेटी होत असतात, त्यात विशेष काही नाही!
  • शिवसेना-भाजप युतीवरही राणे यांचे मतप्रदर्शन.

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईमुळे शिवसेना आणि भाजपमधील तणाव आणखी वाढला असताना मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. याकडे नारायण राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांत त्यावर प्रतिक्रिया दिली. ( Narayan Rane On CM Thackeray Fadnavis Meeting )

वाचा:राड्यानंतर ठाकरे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा!; नेमकं काय ठरलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने नारायण राणे यांना अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले. हे अटकनाट्य संपल्यानंतर शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातून राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली. एकीकडे ही यात्रा पुढे जात असतानाच मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची वार्ता आली. यावर पत्रकारांनी राणे यांची प्रतिक्रिया विचारली असता, या प्रकारच्या भेटी होत असतात, त्यात विशेष काही नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. भविष्यात भाजप व सेना यांची पुन्हा युती झाली तर तुमची भूमिका काय असेल असा प्रश्न केला असता, आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे राणे यांनी नमूद केले.

वाचा:‘…तर ही वेळ आली नसती!’; राणेंच्या अटकेवर अजित पवार थेटच बोलले

ठाकरे-फडणवीस भेटीने तर्कवितर्कांना उधाण

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यात दहा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर दरेकर तिथून निघाले आणि उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास १५ मिनिटे चर्चा झाली, असे सांगण्यात येत आहे. या चर्चेचा तपशील मिळाला नाही, मात्र शिवसेना-भाजपमधील तणाव हा मुद्दा या चर्चेत होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही पक्षांनी संयम बाळगला पाहिजे, यावर हे दोन्ही नेते बोलल्याचे कळते. बैठकीत नारायण राणे यांच्याबाबत चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

वाचा:राज्यात गणेशोत्सवावर यंदाही कठोर निर्बंध?; केंद्र सरकारने केली स्पष्ट सूचना

Source link

Narayan Ranenarayan rane jan ashirwad yatra updatenarayan rane latest newsnarayan rane on cm thackeray fadnavis meetinguddhav thackeray devendra fadnavis meetingउद्धव ठाकरेजन आशीर्वाद यात्रादेवेंद्र फडणवीसनारायण राणेशिवसेना
Comments (0)
Add Comment