तरुण पकडायला गेले खेकडे अन् हाती लागली चक्क मगर

हायलाइट्स:

  • खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांना सापडली मगर
  • मगरीचा ताबा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे
  • नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सांगली : सांगली जिल्ह्यातील कुरळप ते येलूरदरम्यान ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांना मगर सापडली आहे. तरुणांनी मोठ्या धाडसाने मगर जेरबंद केली. यानंतर मगरीचा ताबा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील नदीकाठांवर मगरी आढळत होत्या. मात्र आता ओढे आणि नाल्यांमध्येही मगरी आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुरळप येथील आठ ते दहा तरुण गुरुवारी रात्री कुरळप ते येलूर दरम्यान असलेल्या ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना ओढ्याकडेला एक मगर दिसली. वारणा नदीपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर ओढ्यात मगर दिसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. या मगरीकडून कोणावर हल्ला होऊ नये, यासाठी तरुणांनी तातडीने तिला जेरबंद केले.

Narayan Rane: ठाकरे-फडणवीस भेटीवर नारायण राणे यांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले…

सुमारे पाच फूट लांबीची मगर मोठ्या धाडसाने पकडून तरुणांनी ती वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडे सोपवली.

मगरीला पकडण्याच्या मोहिमेत संदीप पवार, अमोल पवार, बाबासाहेब पाटील, बंडा घनवट, सुशांत वडार, विवेक वडार, मिलिंद पाटील, शिवप्रसाद बाबर, आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, महापुरानंतर मगरी पुन्हा नदीपात्रात परतत आहेत. गेल्या पंधरा दिवसात कृष्णा नदीसह वारणा नदीच्या काठावरही मगरींचा वावर वाढला आहे.

दरम्यान, नदी पात्रासह परिसरातील मगरींना कोणीही इजा पोहोचवू नये, तसंच त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. मात्र मानवी वस्तीकडे येणाऱ्या मगरींमुळे नागरिकांमध्ये भीती वाढत आहे.

Source link

Sangalisangali newsमगरसांगलीसांगली पूर
Comments (0)
Add Comment