पितृपक्षातील एकादशीला करा ‘या’ गोष्टी; पितर होतील प्रसन्न, सुख समृद्धी अन् होईल भरभराट

या उपायाने मनोकामना पूर्ण होतील

ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळावर दुधाचे पाणी घालून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर पाच प्रकारची मिठाई अर्पण करा आणि झाडाखाली विष्णु सहस्त्रनाम पठण करा. यानंतर ११ वेळा प्रदक्षिणा घालून तुमची इच्छा बोला. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूच्या कृपेने प्रलंबित कामे पूर्ण होतात.

या उपायाने पितरांचा आशीर्वाद मिळेल

इंदिरा एकादशीचे विशेष महत्त्व असून या दिवशी मनापासून व्रत ठेवावे, दान करावे, पितरांच्या नावाने तर्पण व ब्राह्मण भोजन द्यावे आणि सायंकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा. असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते सुखी होऊन आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देतात. याशिवाय पितृदोषही दूर होतो.

या उपायाने होईल मोक्षप्राप्ती

संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत ठेवावे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीच्या माळाने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. तसेच भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा आणि अन्न अर्पण करताना तुळशीची पाने घालून नैवेद्य द्या. असे केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांची पापेही नष्ट होतात.

तुळशी जवळ दिवा

पितृपक्ष एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करावी. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून तुळशीला तुपाचे ११ दिवे लावा. यानंतर तुळशीजवळ बसून इंदिरा एकादशीची व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी. यानंतर संध्याकाळी घराच्या मुख्य गेटच्या दोन्ही बाजूला दिवे लावा. असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि सर्व प्रकारचे संकट टळते.

इंदिरा एकादशी २०२३

इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान शालिग्रामची पूजा केल्यानंतर पाच लोकांसाठी अन्न तयार करावे. सर्वप्रथम गाय, कावळा, कुत्रा, मांजर आणि कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तीला जेऊ घाला. मुंग्यानाही पीठ खायला टाका. असे केल्याने पितर प्रसन्न राहतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. तसेच, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक उर्जा सतत संचारत राहते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

ekadashi 2023 upayekadashi upayindira ekadashi 2023 remedypitru paksha ekadashi upay in marathiइंदिरा एकादशी २०२३पितृपक्षातील एकादशीचे उपाय
Comments (0)
Add Comment